पाचोरा खेडगाव दरम्यान पांडुरंग हॉटेल जवळ अपघात

पाचोरा खेडगाव दरम्यान पांडुरंग हॉटेल जवळ अपघात; हायवे मृत्यूजय दूतच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जखमी इसमास मदत!

पाचोरा प्रतिनिधी आज दिनांक 24 मार्च रोजी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान जळगाव पाचोरा हायवे वरील बिल्दी पुलालगत पांडुरंग गार्डन जवळ उसाच्या भरलेल्या ट्रक क्रमांक एम एच 04 एफ पी 1542 ला मागून मोटरसाय क्रमांक एम एच 19 बी इ 9971 वर असलेल्या इसमाने धडक दिली असून यामध्ये पाथरी येथील रहिवासी नाव देवेंद्र हिरामण चौधरी हे जबर जखमी झाले असून यांना हायवे मृत्युंजय दूत सहकारी पवन धनराळे तसेच वेरुळी येथील माजी सरपंच बाळू तात्या त्याच बरोबर रस्त्यावरील प्रवाशी तात्काळ मदतीसाठी धावून गेले असून सदर इसमास ॲम्बुलन्स मध्ये टाकून पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे असल्याची माहिती मिळावी असून यामध्ये सदर इसमाची ट्रकला जबर धडक दिल्याने दुखापती मध्ये रक्तस्राव जास्त प्रमाणावर झाला असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.