कला छंद आर्ट फाऊंडेशन ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेस पाचोरा येथील विद्यार्थीनी उन्नती नितीन पाटील हिस राज्यस्तरावर द्वितीय पुरस्कार

कला छंद आर्ट फाऊंडेशन ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेस पाचोरा येथील विद्यार्थीनी उन्नती नितीन पाटील हिस राज्यस्तरावर द्वितीय पुरस्कार

महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी “महानिर्मिती” च्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त “पारंपरिक ऊर्जा संवर्धन व पर्यावरण ” या विषयावर राज्यस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आली होती.यात संपूर्ण राज्यातून जळगाव, अमरावती, मुंबई ,चंद्रपूर, औरंगाबाद अशा अनेक जिल्ह्यातून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कला छंद आर्ट फाऊंडेशन ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेस पाचोरा येथील विद्यार्थीनी उन्नती नितीन पाटील हिस राज्यस्तरावर द्वितीय पुरस्कार देण्यात आला. रोख रू. 5000 प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार मुंबई वांद्रा येथील प्रसिद्ध रंगशारदा भवन येथे नुकताच पार पडला. या स्पर्धेस मा. आभा शुक्ला प्रधान सचिव (ऊर्जा ) महाराष्ट्र शासन तसेच मा.डॉ.पी. अनबलगन भा.प्र.से. अध्यक्ष व महा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र संचालक महानिर्मिती यांची विशेष उपस्थिती लाभली.यासह अनेक विशेष मान्यवर या वेळी उपस्थित होते. उन्नती हि गजानन डेअरी पाचोरा येथील संचालक नितीन पाटील राहणार अंतूर्ली यांची मुलगी होय. उन्नती पाटील हिस कला शिक्षक शैलेश कुलकर्णी कला छंद आर्ट फाऊंडेशन पाचोरा यांचे मार्गदर्शन लाभले.उन्नतीवर संपूर्ण शहरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.