शिवसन्मान प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप

शिवसन्मान प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप.

जामनेर (प्रतिनिधी) शिवसन्मान प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शिव सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असते. मागील गेल्या 2 वर्षात कोरोना परिस्थितीमुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम शिव सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. यावर्षी देखील संस्थापक अध्यक्ष विश्वजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला माजी युवासेना उपजिल्हाप्रमुख ॲड भरत पवार, शिवसेना जामनेर तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक ईश्वर चोरडिया, राष्ट्रवादी पदवीधर सेल प्रदेश चिटणीस संदिप पाटील, शिवसेना जामनेर शहरप्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ , तोंडापूर फत्तेपूर गट प्रमुख तुकाराम गोपाळ, युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील, युवासेना तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव, शिवसैनिक विकास अहिर, ज्ञानेश्वर धोड, सईद शेख, बाबू शेख,अलीयार खान, हे यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते.