वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना पाचोरा तर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा समाजातील ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा

दि. 22/2/2022 रोजी वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, पाचोरा, (जळगाव) या संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, समाजातील ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा,निवृत्त कर्मचारी सत्कार, मोफत आरोग्य शिबिर, कर्मचारी मेळावा व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्री. मेहताबसिंग नाईक यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी श्री. बी. बी. धाडी, सर (जिल्हाध्यक्ष), प्रा. डाँ. डी. यु. राठोड (सचिव), श्री.महेंन्द्र चव्हाण (कार्याध्यक्ष), प्रा. डॉ. राजेन्द्र राठोड (जि.उपाध्यक्ष), श्री. रोहीदास पवार (सह-सचिव), श्री. भारमलभाऊ नाईक (प्रसिद्घी प्रमुख), श्री.कैलास राठोड(जि.का.सदस्य),श्री. कोमल जाधव, सर, श्री. ईश्वर चव्हाण (ता.प्रमुख-जळगाव), श्री. बन्सी चव्हाण (ता.प्रमुख-जामनेर), श्री. गणेश राठोड, श्री. अमरसिंग राठोड व जळगाव, पाचोरा, जामनेर व चाळीसगाव येथील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. राजेन्द्र काशिनाथ राठोड (जि.का.सदस्य) यांनी तर सुत्रसंचालन श्री. संजय राठोड (ता.अध्यक्ष-पाचोरा) व आभार प्रदर्शन श्री. वासुदेव चव्हाण (ता.उपाध्यक्ष) यांनी केले.
सदर कार्यक्रमात श्री. बी. बी. धाडी, सर(जिल्हाध्यक्ष) यांनी जिल्हात संघटनेच्या वतीने समाज व संघटना
मजबूत करण्यासाठी जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली.
तसेच भारमलभाऊ नाईक (जि.प्रसिध्दी प्रमुख) यांनी संघटनेच्या वतीने श्री. अमरभाऊ राठोड (राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी समाज जागृति साठी सुरु केलेल्या “विमुक्त नाईक” या साप्ताहिकाची माहीती दिली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राजेन्द्र काशिनाथ राठोड (जि.का.सदस्य), श्री. संजय राठोड (ता.अध्यक्ष), श्री. वासुदेव चव्हाण (ता.उपाध्यक्ष), श्री. सीताराम पवार (ता.सचिव) व इतर पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.