पाचोरा भडगाव तालुक्यातील महसूल मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर

पाचोरा भडगाव तालुक्यातील महसूल मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर
मा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या धरणे आंदोलनाला यश

*पाचोरा* या वर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला असून अत्यल्प पाऊस पडला. मोठ्या हिमतीने देवाच्या भरोशावर बळीराजांनी पेरणी केली पावसाच्या ओढीमुळे पिकांची वाढ खुंटली, पिकावर रोगराई पसरली, लागलेली फळधारणा फुले किडकी झाली. उत्पन्नात प्रचंड घट झाली, शेतकऱ्यांची हवालदिल परिस्थिती झाली अशा गंभीर परिस्थितीत शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे. मात्र अहवालाच्या भरोशावर फक्त सहा सर्कल मंडळ जाहीर केली गेली. उर्वरित सर्कलमध्ये सारखीच परिस्थिती असताना हे दुटप्पी धोरण अन्यायकारक आहे. शासनाने फेरविचार करावा आणि पाचोरा भडगाव तालुक्यातील संपूर्णपणे दुष्काळी जाहीर करावा. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील भयंकर स्वरूपात पुढे येईल, शेतकऱ्यांच्या घरात उत्पन्न नाही. तरीदेखील विमा कंपनी 25% अग्रीम मदतीचा हप्ता देण्याचा निर्णय तोही ज्या शेतकऱ्यांनी माहिती पुरवली असेल त्यांनाच ही अट देखील अन्यायकारक आहे. असे न करता तातडीने दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना सरसकट विमा कंपनीने मदतीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा कष्टकरांची जगाच्या पोशिंदा बळीराजा यांची आनंदाची दिवाळी व्हावी. याकरिता दुष्काळ परिस्थितीत दिल्या जाणाऱ्या सवलती तातडीने लागू कराव्यात. पाचोरा, भडगाव सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी शासनाकडे माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या, पाचोरा भडगाव यांनी केली आहे.