पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर-अमोल शिंदे यांनी सर्वांत पाहिले केली होती मागणी व पाठपुरावा

पाचोरा व भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर-अमोल शिंदे यांनी सर्वांत पाहिले केली होती मागणी व पाठपुरावा

——————————————————–

पाचोरा-
पाचोरा व भडगाव तालुक्यात या हंगामात सरासरीपेक्षा ७५ टक्के कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबतीत शेतकऱ्यांसमवेत चर्चा करत असताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुष्काळ जाहीर होण्यासंदर्भाची मागणी होती त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी मा.ना.गिरीष महाजन यांच्याकडे मागणी केली होती.असे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.
या संदर्भात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कुठलाही विलंब नकरता अमोल शिंदे यांनी तात्काळ मुंबई गाठून प्रत्यक्ष मा.ना.गिरीष महाजन यांची भेट घेऊन येत्या काळात पाचोरा व भडगाव तालुक्यातील महसूल मंडळ देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावे व दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्याबाबत विनंती केली होती.
नुकत्याच काल झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यातील महसूल मंडळ यांना दुष्काळग्रस्त परिस्थिती असलेले तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले असून त्यामध्ये पाचोरा तालुक्यातून पाचोरा, नगरदेवळा,गाळण,पिंपळगाव हरेश्वर,कुऱ्हाड,वरखेडी,व भडगाव तालुक्यातुन भडगाव,कजगाव,गोंडगाव, आमडदे,कोळगाव या मंडळांचा समावेश असुन ज्या पद्धतीने दुष्काळग्रस्त तालुक्यांना विविध सवलती लागू होतात अशा सर्व सवलती या तालुक्यांना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
या सवलती मध्ये जमीन महसुली सूट,पीक कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, शेती पंपांना अखंडित वीज, आवश्यक असलेल्या ठिकाणी पिण्याचे पाण्याची टँकर पुरवणे अशा विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत.
यावेळी अमोल शिंदे यांनी सर्व पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगाव वतीने या उपसमितीतील मंत्री ना.गिरीष महाजन व ना.अनिल पाटील यांचे आभार मानले.