शेतकरी बांधवांच्या शेतीच्या नुकसानभरपाईची रक्कम उद्यापासून खात्यावर – इद्रिस मुलतानी

शेतकरी बांधवांच्या शेतीच्या नुकसानभरपाईची रक्कम उद्यापासून खात्यावर – इद्रिस मुलतानी

 

दत्तात्रय काटोले सोयगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी! अलीकडील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीची भरपाईची रक्कम उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती भाजप अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाऊ मुलतानी यांनी दिली.

 

दि. 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सोयगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, मका, सोयाबीनसह केळीच्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले. सुगीच्या तोंडावर आलेले पीक हातातून निसटल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने मा. तहसीलदार मेने मॅडम यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती.

 

या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तत्परता दाखवत नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, नुकसानभरपाईची रक्कम उद्यापासून खात्यावर जमा होणार आहे.

 

या वेळी भाजप अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाऊ मुलतानी, तालुकाध्यक्ष संजय पाटील, जिल्हाचिटणीस सुनील गावंडे, बद्रीभाऊ राठोड, उत्तम चव्हाण, ईश्वर सिरसागर, धनराज चव्हाण, राहुल राठोड, सुरज कवाळ, राजु रेकनोद, किशोर बावस्कर, प्रमोद पाटील (युवा मोर्चा तालुकाध्यक्ष), प्रदीप राठोड, किरण पाटील, सुनिल ठोंबरे, आकाश पाटील, योगेश पाटील, संभाजी पवार, अंकुश राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजप नेहमी कटिबद्ध असून, संकटात असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे इद्रिसभाऊ मुलतानी यांनी सांगितले.