पाचोरा येथे पुस्तक भिशी चे उद्घाटन पाचोरा ….

*पाचोरा येथे पुस्तक भिशी चे उद्घाटन*

पाचोरा
जागतिक मराठी दिन व कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथे ता 27 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी च्या पाचोरा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक व साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या शुभहस्ते देसले क्लासेस, जोगेश्वरी नगर पाचोरा, येथे हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी विजय लुल्हे सर , सुनील पाटील, पत्रकार शिवाजी शिंदे , सुभाष देसले सर, डॉ वाल्मीक अहिरे, भैय्यासाहेब सोमवंशी राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या निमित्ताने श्री विजय लुल्हे यांनी पुस्तक पेढीची संकल्पना, नियम, अटी व कार्यपद्धती समजावून सांगितली. ज्येष्ठ कवी तथा सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक शशिकांत हिंगोणेकर यांनीही जीवनातील वाचनाचे महत्त्व विशद केले. आपण सर्व वाचक गुरुजनांमधून लेखक घडले पाहिजेत आणि लवकरच शिक्षक साहित्य संमेलन स्वतंत्रपणे भरवले पाहिजे असे प्रेरणादायी मत श्री हिंगोणेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले .
मराठी भाषा दिानिमित्त स्वाती पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या “प्रेम “या कवितेचे तर, सारिका पाटील यांनी “गजल” चे आणि डॉ.वाल्मीक अहिरे यांनी कुसुमाग्रजांच्या ” फक्त लढ म्हणा” या कवितेचे वाचन केले .या निमित्ताने अथर्व पब्लिकेशन चे संचालक श्री युवराज माळी व त्यांच्या पत्नी यांनी विविध विषयांवरील ग्रंथसंपदा माफक दरात उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले.तसेच त्यांनी सर्व उपस्थितांना २०२१ ची केलेंडर सस्नेह भेट दिले
पाचोरा येथे पुस्तक भिशी ची संकल्पना साकारल्याबद्द्ल उपस्थितांनी अरुणा उदावंत मॅडम यांचे कौतुक केले. डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक पेढीच्या पाचोरा शाखा समन्वयक पदी अरुणा उदावंत व सारिका पाटील मॅडम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उद्घाटनाच्या दिवशी काढलेल्या पहिल्या भिशीत भैय्यासाहेब सोमवंशी व अशोक परदेशी विजेते ठरले. या कार्यक्रमाला कल्पना देसले मॅडम, श्रीमती गायत्री पाटील,सीमा पाटील कुमुद पाटील, राकेश सपकाळे सर आदी वाचक मित्र उपस्थित होते. स्वाती पाटील मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. अरूणा उदावंत यांनी आभार मानले.