जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची पारोळा तालुका कार्यकारिणी झाली जाहीर !

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची पारोळा तालुका कार्यकारिणी झाली जाहीर !

संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री. अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री. ईश्वरभाऊ चोरडिया यांनी श्री.भानुदास भारंबे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.महेश पी शिरसाठ , जिल्हा सचिव श्री.जितेंद्र महाजन, जिल्हा सरचिटणीस श्री.राकेश जावरे यांच्या उपस्थितीत पारोळा तालुक्यातील वेब मिडिया असोसिएशन कार्यकारिणी केली जाहीर.

( जिल्हा प्रतिनिधी- जळगाव )

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनला व वेब पोर्टल पत्रकार संघटने’ला जोरदार प्रतिसाद मिळत असुन* प्रत्येक तालुक्यात वेब पोर्टल चे पत्रकार मोठ्या संख्येने या संघटनेत सामील होतांना दिसुन येत आहे.

आज पारोळा येथे वेब मिडिया असोसिएशन च्या तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.* रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. *संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडिया अध्यक्षतेखालील श्री.भानुदास भारंबे ,जिल्हा उपाध्यक्ष श्री.महेश पी शिरसाठ , जिल्हा सचिव श्री.जितेंद्र महाजन, जिल्हा सरचिटणीस श्री.राकेश जावरे, यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

पारोळा येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार* यांच्या बैठकीत सर्वानुमते पारोळा तालुका *कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.

🔸पारोळा तालुका वेब मिडिया असोसिएशन कार्यकारणी

तालुका अध्यक्ष- श्री.योगेश बालु पाटील
तालुका उपाध्यक्ष- श्री.दिपक गुरूदास भावसार
तालुका सचिव- श्री.रमेशकुमार संपतलाल जैन
तालुका सरचिटणीस -श्री.राकेश माधवराव शिंदे
तालुका समन्वयक – श्री.जितेंद्र महादु वानखेडे
तालुका खजिनदार – श्री.विकास चौधरी
यांची पारोळा तालुका कार्यकारिणी’वर निवड करण्यात आली आहे.तर पारोळा तालुका कार्यकारिणी वर अनेक सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

वेब मिडिया असोसिएशन पारोळा तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.