श्री गो से हायस्कूल मध्ये हिंदी दिवस साजरा
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूल मध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत आपले मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री आर बी तडवी सर अध्यक्ष स्थानि होते त्यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले मंचावर शाळेचे मुख्याध्यापक श्री एन आर पाटील सर पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल मॅडम ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस वाघ ज्येष्ठ शिक्षक संजय करंदे शिक्षिका सौ जी वाय पाटील शिक्षक रवी पाटील उपस्थित होते सूत्रसंचलन श्री आर बी बोरसे सर यांनी केले तर आभार रवी पाटील सर यांनी केले

























