आद्यकवी महर्षि वाल्मिक जयंती निमित्त आंतरशालेय खो-खो स्पर्धेस सुरूवात 

आद्यकवी महर्षि वाल्मिक जयंती निमित्त आंतरशालेय खो-खो स्पर्धेस सुरूवात

जळगाव येथील श्री महर्षि वाल्मिक क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था आयोजित आद्यकवी श्री महर्षि वाल्मिक जयंती निमित्त आंतरशालेय खो-खो स्पर्धेस वाल्मिक नगर मधील नवीन बालविकास विद्या मंदिराच्या प्रांगणात उत्साहात सुरूवात झाली स्पर्धेचे उदघाटन शहराचे आमदार श्री राजुमामा भोळे यांनी आद्यकवी श्री महर्षि वाल्मिक यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करून तसेच मैदानाचे पूजन व श्रीफळ वाढवून केले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे संस्थापक सचिव श्री प्रभाकरआप्पा सोनवणे,सदस्य श्री भरत सपकाळे,माजी खेळाडू श्री निलेश(आबा) तायडे,भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एल एस तायडे, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव श्री राहुल पोळ,श्री एन डी सोनवणे,जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव श्री राजेश जाधव, जळगाव जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव श्री प्रशांत जगताप, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सहसचिव श्री नितिन पाटील,श्री अर्जुन भारुडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे प्रशिक्षक श्री विष्णू ठाकरे यांनी केले.आज आर आर विद्यालय,अनुभूती स्कुल,अभिनव विद्यालय,श्रीराम विद्यालय,भाऊसाहेब राऊत विद्यालय,ला ना सार्वजनिक विद्यालय,श्री महर्षी वाल्मिक विद्यालय,प्रगती विद्यालय,सेंट लॉरेन्स स्कुल या संघादरम्यान सामने झाले स्पर्धेत पंच म्हणून जळगाव जिल्हा खो खो असोसिएशनचे विशाल पाटील,दिलीप चौधरी,हेमंत ठाकूर,निरंजन ढाके,तुषार सोनवणे,गोपाल पवार,विजय क्षिरसागर, छगन मुकडे हे काम पहात आहे यशस्वी आयोजनासाठी मयुर सोनार,ईश्वर सनंसे, पवन सोनवणे,स्वप्नील कोळी सागर सोनवणे,तेजस सपकाळे,मयुर भाऊ सपकाळे राकेश सोनवणे हे परिश्रम घेत आहे.