डाॅ.भुषणदादा यांचा पुन्हा एकदा मदतीचा असा माणुसकीचा हात

डाॅ.भुषणदादा यांचा पुन्हा एकदा मदतीचा असा माणुसकीचा हात

दुचाकीवरून खाली पडलेल्या जखमी महिलेला आपल्या गाडीत टाकुन दिली तातडीची वैद्यकीय मदत आणि केले अमळनेर येथे दवाखान्यात अॕडमिट

रात्री ९:३० वाजता – रत्नापिंप्री गावाजवळ झाला दुचाकीचा अपघात –

*विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल चे संचालक डाॅ.भुषणदादा मगर* हे काही कार्यक्रमासाठी अमळनेर येथे गेले होते.रात्री कार्यक्रम आटोपुन पाचोरा येथे परतत असतांना अमळनेरहुन पारोळा येत असतांनाच मध्यावधी रस्त्याच्या कडेला एक लहान बाळ हातात घेतलेल्या महिलेचा दुचाकीवरून खाली पडुन अपघात झाल्याचे समोर दिसले.ती महिला आपल्या मुलासोबत पारोळाहुन अमळनेर येथे आपल्या घरी परतत होती.

हा अपघात रस्त्यामधील डिव्हाईडर ला लागुन झाल्याने व घडल्याने महिला आपल्या बाळाला घेऊन खाली पडली आणि महिलेच्या चेहर्यावर लागल्याने – महिला जखमी झाली होती.

अशा परिस्थितीत डाॅ.भुषणदादा मगर यांनी कुठलीही चिंता न करता रूग्णसेवेचा अविरात गुण जोपासत एक हात मदतीचा- माणुसकीसाठी म्हणुन – त्या जखमी महिलेला आपल्या गाडीत टाकुनी क्षणाचाही विलंब न करता पारोळा कडे न जाता त्यांनी जखमी महिलेला त्यांच्या रहिवास असलेल्या अमळनेर येथील हाॅस्पिटल’ येथे अॕडमिट केले व अमळनेर येथील त्यांचे डाॅक्टर मित्र डाॅ.दिलीप पाटील यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे सांगितले.यानंतर महिलेचे नातेवाईक यांना फोन करून याबाबत माहिती व सुचना दिल्यानंतर ते पण हाॅस्पिटल’ला पोहचले.महिला रूग्णाच्या नातेवाईक यांनी माणुसकी म्हणुन वेळीच मदत केल्याने डाॅ.भुषणदादा मगर यांचे मनापासुन आभार मानले.आता त्या महिलेचा उपचार नर्मदा मेडीकल फाऊंडेशन अमळनेर डाॅ.अनिल शिंदे यांच्या हाॅस्पिटल येथे सुरू आहे.