मिठाबाई माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहक जागृती प्रबोधन

मिठाबाई माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहक जागृती प्रबोधन

 

मिठाबाई माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्राहक जागृती प्रबोधन पर अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रम व पाचोरा भडगांव रोटरी क्लब यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व श्री.स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम त ग्राहक तीर्थ आदरणीय बिंदुमाधव जोशी,राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामीविवेकानंद यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करुन जयंती निमित्त मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब अध्यक्ष डॉ.पंकज शिंदे,सचिव डॉ.मुकेश नईनव,तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सचिव संजय पाटील,तालुका संघटक शरद गीते, कोषव्यवस्थपन समिती प्रमुख ॲड.स्वप्नील सुधाकर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ.उजवला महाजन मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पंकज शिंदे यांनी सर्वसामान्य प्रमाणे ग्राहकांची होणारी फसवणूक तर डॉ.मुकेश नाईनव यांनी ग्राहक जागरूकता व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे ॲड.स्वप्नील पाटील यांनी ग्राहक कायदा त्यातील 2020 मध्ये झालेले बदल यावर सविस्तर मार्गदर्शन केले.तालुका संघटक शरद गीते यांनीही ग्राहकांचे हक्क व जागरूक ग्राहक यावर आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्यावर प्रकाश टाकणारे विद्यार्थिनींनी कु.प्रेरणा सुनील वाबळे ,राजश्री हटकर ,आदी विद्यार्थिनींनी उदाभोदक अशी भाषणे केलीत.एकलव्य स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळविले ल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ.अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांचे अथक परिश्रमातून अस्तित्वात आलेल्या ग्राहक संरक्षण कायदा त्याची पार्श्वभूमी ,जिल्ह्यात व तालुक्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे कार्य ,फसवणूक झालेल्या ग्राहकांची आतापर्यंत केलेली सोडवणूक व दिलेला दिलासा यावर विविध दाखले देत तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांनी घडवलेले छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रीय युवा शक्ती असलेले स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केले. मिठाबाई कन्या विद्यालय तील विद्यार्थिनी प्रती आजवर रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी आजवर विद्यार्थिनी हिताचं केलेया कार्याची उजळणी करीत याही वर्षी सढळ हाताने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनी साठी सहाय्य होईल असे प्रोजेक्ट अमलात आणावे म्हणून विनंती वजा आवाहन केले.
श्री आर .बी.पाटील सर यांनी आभार प्रदर्शन करून त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.