सोयगाव नारळीबाग येथील घटना – माणुसकीचा अनमोल संदेश

सोयगाव नारळीबाग येथील घटना – माणुसकीचा अनमोल संदेश

 

 

 

तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती येथील

संभाजीनगर सोयगाव नारळीबाग येथील गावात माणुसकीचे एक हृदयस्पर्शी उदाहरण घडले.

 

श्री उद्धव कराळे, मजुरी करून संसाराचा गाडा हाकणारे, अत्यंत कष्टाळू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व्यक्ती, काल सायं. ६ वाजून १० मिनिटांच्या सुमारास मेडिकळवरून जात असताना त्यांच्याकडील ८ हजार रुपये नकळत खिशातून पडले.

 

दरम्यान, तेथून जात असलेल्या आरोग्य धूत दिगंबर वाघ यांच्या नजरेस ते पैसे पडलेले दिसले. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात अशी रक्कम सापडणे म्हणजे अनेकांसाठी लालूचाचा विषय. मात्र दिगंबर वाघ यांनी प्रामाणिकपणाचा व माणुसकीचा परिचय देत, तात्काळ श्री कराळे यांना फोन करून,

“दादा, तुमचे पैसे इथे पडले आहेत,” असे सांगितले आणि रक्कम त्यांच्या हातात परत केली.

 

अचानक हरवलेले आठ हजार परत मिळाल्याने, आयुष्यभर मजुरी करून कुटुंबाची गाठ बांधणाऱ्या कराळे यांना दिलासा मिळाला. डोळ्यांत पाणी आणणारे हे प्रसंग पाहून गावकऱ्यांनीही दिगंबर वाघ यांच्या प्रामाणिक वृत्तीचे कौतुक केले.

 

आजच्या काळातही अशी निर्लोभी माणुसकी जिवंत आहे, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

दिगंबर वाघ यांनी दाखवलेला हा आदर्श, समाजासाठी प्रेरणादायी ठरावा, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

 

फोटो दत्तात्रय काटोले