खान्देशी वही गायन लोककलावंतांच्या मेळाव्याचे नगरदेवळ्यात आयोजन

खान्देशी वही गायन लोककलावंतांच्या मेळाव्याचे नगरदेवळ्यात आयोजन

नगरदेवळा खान्देश लोक कलावंत विकास परिषद आयोजि त खान्देशातील वही गायन लोक कलावंतांचा खान्देश विभागीय लोक कलावंत मेळाव्याचे आयोजन दिनांक २८/११/२०२१ रविवार रोजी पाटील मंगल कार्यालय नगरदेवळा येथे सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत करण्यात आले आहे .मेळाव्याचे उद्घाटन व दीप प्रज्वलन पाचोरा-भडगाव तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी नगरदेवळा बाळद गटाचे जि.प. सदस्य तथा शिवसेना जि.प.गटनेते श्री.रावसाहेब (जिभु) पाटील असणार आहेत.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी महिला सरपंच सौ.प्रतीक्षा काटकर ,संजय देसले ,रामचंद्र देशमुख ,गोपाळभाऊ कोळी ,गणेश महाजन ,संतोष ठाकूर,भालचंद्र वाणी असणार आहेत .कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील असून या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक श्री विनोद ढगे यावेळी उपस्थित लोककलावंतांना मार्गदर्शन करणार असून या मेळाव्यात सहभागी होऊन आपली कला सादर करणाऱ्या कलावंतांना सन्मानपत्र देण्यात येणार असल्याचे मेळाव्याचे आयोजक साई शक्ती वही मंडळ नगरदेवळा यांनी कळविले आहे…!