श्री.सु‌.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु‌.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज 🇮🇳हर घर तिरंगा🇮🇳 अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ मासाहेब,सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पंडित नेहरू,वीर जवान अशा विविध वेशभूषेसह मोठ्या उत्साहात भारत मातेच्या जय घोषात प्रभात फेरीत सहभाग घेतला. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर व समस्त शिक्षक वृंद उपस्थित होता.प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.