खडकदेवळा हायस्कूल मध्ये ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

खडकदेवळा हायस्कूल मध्ये ग्रंथ प्रदर्शन उत्साहात

पाचोरा — तालुक्यातील माध्यमिक विद्यालय खडकदेवळा येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

खडकदेवळा येथील साईनाथ सार्वजनिक वाचनालय, वाय. पी. पाटील फाउंडेशन व माध्यमिक विद्यालय खडकदेवळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारे सुमारे 600 ग्रंथ व त्यासोबतच अन्य वाचनीय पुस्तके प्रदर्शनासाठी मांडण्यात आलेली होती. सकाळ व दुपार सत्रातील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा सोनवणे मॅडम अध्यक्षस्थानी होत्या. पर्यवेक्षिका श्रीमती कुंदा पाटील- शिंदे यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी विश्वस्त प्रमोद गरुड, साईनाथ वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटील, संचालक विश्वास पाटील, संजय पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमोद गरुड व डॉ. यशवंत पाटील यांनी उद्घाटन सत्रात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन तर अतुल घोडेश्वर यांनी आभार प्रकटन केले.