गो.पु.पाटील विद्यालय,कोळगावचा,पहिलवान स्वराज चौधरी याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

_गो.पु.पाटील विद्यालय,कोळगावचा,पहिलवान स्वराज चौधरी याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…!!!!_

भडगाव (प्रतिनिधी)
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव ता-भडगाव येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचा पहिलवान स्वराज प्रल्हाद चौधरी याने येवला जि.नाशिक येथे पार पडलेल्या नाशिक विभागस्तरीय ग्रीकरोमन कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाआतील ५५ किलो वजनी गटात प्रथमस्थान प्राप्त केले असून त्याची कुरुंदवाड जि.कोल्हापूर येथे आयोजीत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्वराज यांस सह्याद्री तालीम संकुल,पुणे येथील,वस्ताद विजय काका बराटे,संजय कराळे,सयाजी मदने,कल्पेश कराळे,प्रल्हाद चौधरी,प्रमोद थोरात,संदीप पठारे,निलेश पाटील,दिलीप पडवळ,संजय दाभाडे,म्हस्के आप्पा,पाटील सर,आकाश सोनवणे,साहिल संकपाळ,बी.डी.साळुंखे,प्रा.रघुनाथ पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्वराजच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,यांनी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी आनंद व्यक्त करीत त्याचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.