मयत डॉ संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी बनकरचा लॅपटॉप आणि पोलीस उपनिरीक्षक बदनेचा मोबाईल पोलीसा कडून जप्त,तपासात अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले ?
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या डॉ संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून ते संपूर्ण माहिती तपास लागेपर्यंत गोपनीय ठेवण्यात येणार आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे.दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील दिलीप भोसले यांच्या हॉटेल मधुदिपच्या रूम नंबर ११४ मध्ये डॉ संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली होती.हातावरील सुसाईट नोटमध्ये त्यांनी घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांनी शारीरिक व मानसिक त्रास दिला तर फलटण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा अत्याचार केल्याचे नमूद केले होते.या घटनेने संपुर्ण महाराष्ट्रातील महीला वर्गात संतापाची लाट उसळली आहे.त्यातच महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी मृत डॉ संपदा मुंडे यांच्या चारीत्र्यावरच शिंतोडे उडवून आनखीच या प्रकरणास खतपाणी घातले होते.आणि संशयित आरोपीला वाचवण्यासाठी चा केविलवाणा प्रयत्न केला होता यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असुन संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात येत आहे.त्यांनी संशयित आरोपी गोपाल बदने आणि मयत डॉ मुंडे यांचा जानेवारी फेब्रुवारी मार्च नंतर संपर्कच आला नसल्याचे प्रसार माध्यमांना खोटे सांगितले होते.तर कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मयत डॉक्टर वर १५जून,१०जुलै, ५ऑगष्ट,२० सप्टेंबर २०२५ या चार दिवशी अत्त्याचार झाल्याचे सांगितले.संपुर्ण महाराष्ट्र उठलेले वादळ पाहून अत्यंत तातडीने फलटण येथील मयत डॉ संपदा मुंडे यांच्या मृत्यूची एस आय टी मार्फत चौकशी करण्यासाठी आय पी एस दर्जाच्या वरीष्ठ महीला पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली आहे.उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉ संपदा मुंडे यांनी जिवंत असताना वरीष्ठाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्या चार पाणी तक्रार अर्जामध्ये निरीक्षक हा शब्द ९ वेळा लिहिला होता त्यावेळी निरीक्षक मधल्या “री” या शब्दाला दुसरी वेलांटी दिली होती मग डॉ संपदा मुंडे यांच्या हातावरील सुसाईट नोटमध्ये निरिक्षक या शब्दातील “रि” या शब्दाला पहिली वेलांटी कशी काय आहे म्हणजेच हे हातांवर दुसऱ्याच कुणीतरी व्यक्तीने लिहिले असावे असा संशय व्यक्त केला आहे.ही आत्महत्या नसून खूनच केला आहे असा आरोप करत मयत डॉक्टरच्या आई वडिलांना पोलिसांनी रात्री सात वाजता डॉ संपदा मुंडे यांचा मृत्यू झाला होता असे सांगितले होते मग त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत संपदाचा मोबाईल फोन वरील हाॅटसाॅप कसे काय सुरू होते.त्यावर ऑनलाईन कोण पहात होते असे अनेक शंका व्यक्त करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.अंधारे यांनी मयत डॉ संपदा मुंडे यांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ,डी. वाय. एस.पी.राहुल धस, पोलिस निरीक्षक अनिल महाडिक, पोलिस उपनिरीक्षक जायपत्रे,पोलिस उपनिरीक्षक पाटील,पोलिस कर्मचारी अभंग,माजी खासदार यांचे दोन पीए शिंदे आणि नागटिळक, अभिजित निंबाळकर,यांना सह आरोपी करून चौकशीच्या कक्षेत आणले पाहिजे अशी मागणी केली आहे.रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की बाराशे वर्षांच्या इतिहासाला कलंक लागला आहे.फलटण तालुक्यातील ८४ गावाची संस्कृती बिघडवू नका.नाईक निंबाळकरांच्या नावाच्या ब्रॅण्डच वाटोळे केले आहे. रामराजेंनी आयुष्यभर मी भाऊबीज साजरी करणार नाही कारण या दिवशी डॉ संपदा मुंडे या सरकारी काम करणाऱ्या माझ्या कर्तव्यदक्ष लाडक्या बहीणीचा मृत्यू झाला आहे.तीची आठवण म्हणून मी माझ्या स्वतःच्या खर्चाने फलटणच्या उपजिल्हा रुग्णालया समोरील जागेत डॉ संपदा मुंडे यांचा पुतळा उभारणार असल्याचे सांगत त्यांनी निंबाळकर घराण्याच्या वतीने डॉ संपदा मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.योग्य रीतीने न्याय मिळावा म्हणून मयत डॉ संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कडे काही मागण्या मान्य करण्यासाठी लेखी तक्रार करून या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.वंचित बहुजन आघाडीच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षाताई रुपवते यांनी राज्य महिला आयोगाची भूमिका ही पिडीत महीलांना न्याय मिळवून देण्यासाठीची भुमिका असली पाहिजे.मयत डॉक्टरांच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध केला आहे. आयोगाच्या अध्यक्षा राजिनामा देत नसतील तर सरकारने त्यांना घटनेतील कलम ४ नुसार निर्णय घेऊन त्या पदावरून काढावे. रुपवते यांनी सदर मयत डॉ संपदा मुंडे यांची बदनामी थांबवावी, पोलीसांची एस आय टी नेमावी, मिडिया ट्रायल बंद करावी, अत्याचारीत महिलांवरील अंन्याय दाबवून टाकण्याचे प्रकार थांबवावेत. महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त महिलांनी लढावं पण आत्महत्या करू नये असे आवाहन रुपवते यांनी केले आहे.बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख यांनीही या प्रकरणी लक्ष घालून मयत डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि स्वराज्य साखर कारखान्यातील कामगार,ऊसतोड मजूर,मुकादम यांच्या वर झालेल्या अन्यायाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कडक कारवाई करण्यात आली पाहिजे असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.दिवाळीच्या दिवशी रात्री आक्षेपार्ह फोटो काढल्यामुळे डॉ संपदा मुंडे आणि बनकर यांचे कडाक्याचे भांडण झाले होते.नंतर प्रशांत बनकरने माझ्या घरात राहु नकोस म्हणून डॉ संपदा मुंडे यांना धमकावले होते म्हणून त्यांनी नाईलाजाने रात्री उशिरा हॉटेल मधुदिपच्या रूम मध्ये जावून आश्रय घेतला होता.नंतर त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाॅटेलच्या ११४ नंबर च्या खोलीत लटकवलेल्या स्थीतीत आढळला होता.या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रातील महिला वर्गात सन्नाटा पसरला आहे.डॉ संपदा मुंडे यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे अशी संपूर्ण राज्यभरातून मागणी करण्यात येत आहे.
























