गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : हजारो प्रेक्षकांची उपस्थिती

गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; हजारो प्रेक्षकांची उपस्थिती,

पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा शहरातील नामांकित गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रिंसीपल प्रेमकुमार शामनानी यांच्या संकल्पनेतून दिनांक ३१ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते, या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्तगुणांची उधळण करत रंगा -रंग असे कार्यक्रम सादर केले, यात विविध सामूहिक नृत्य सादर करण्यात आले, प्रामुख्याने गणेश वंदना, लावण्या, देशभक्तीपर गीत, फनी डान्स, यांनी प्रेषक वर्गाला मंत्रमुग्ध केले,

गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, प्रिन्सिपल प्रेमकुमार शामनानी यांनी मंचावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले,
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मनिष चंदनानी, कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ठ स्वतंत्र सैनिक व्ही.एम.पाटील, प्रमुख अतिथी हरीभाऊ तुकाराम पाटील संस्थापक अध्यक्ष. बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन, दिलीप पाटील (पत्रकार), पाचोरा मुखिया गुलाबशेठ पजवानी, लक्ष्मणदास पूर्सनाणी, भाईसाहेब मोहनसिंग, प्रकाश शामनाणी, शंकरलाल शामणानी, निखिल शामनाणी, धणीचद कुंदणानी, गोदुशेठ रिझाणी, पुरणशेठ शामनाणी, मा.श्री.दिपक भगवानदास चंदनाणी यांचे स्वागत करण्यात आले,

पाचोरा शहरातील गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, जामनेर रोड, पाचोरा या स्कूल चा भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख पाहुणे, सर्व विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उत्साहात सादर झाला,
सदर कार्यक्रमास पाचोरा तालुक्यातील हजारो चाहत्यांची तसेच पालक वर्गाने आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थिती दिल्याने सदरचा सांस्कृतिक कार्यक्रमातील मैदान हाऊस फुल्ल झाल्याने चाहत्यांनी मोठ्या संख्येने उभे राहूनच कार्यक्रमाचा आनंद घेतला,

सर्व पालक वर्गाने तसेच चाहत्या वर्गाने स्कूल ने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना वाणी मॅडम व अमेना बोहरा यांसह चिमुकल्यांनी केले,
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्रिन्सिपल, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद हितचिंतकांनी परिश्रम घेतले,