तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथे

तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे

जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव व पंचायत समिती पाचोरा व गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल पाचोरा आयोजित तालुकास्तरीय 14 व 19 वर्ष आतील खो खो गव संपन्न झाली. स्पर्धेत तालुक्यातील 14 वर्ष वयोगटात मुलींचे 12 संघ तर मुलांचे 13 संघांनी व 19 वर्ष आतील गटात 3 मुलींचे तर 3 मुलांचे संघांनी सहभाग घेतलेला होता. स्पर्धेच्या उद्घाटन उदघाटन गुरुकुल शाळेचे प्रिन्सिपल श्री. प्रेम शमनानी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी तालुका क्रीडा समन्वयक श्री.गिरीश पाटील हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.क्षितिजा हटकर यांनी केले तर आभार सौ अमेना बोहरा यांनी मानले. 14 वर्ष आतील मुलींमध्ये सरदार एस.के.पवार हायस्कूल नगरदेवळा तर मुलांमध्ये समाज विकास विद्यालय शिंदड विजयी ठरला व 19 वर्ष आतील मुलींमध्ये सरदार एस.के.पवार हायस्कूल, नगरदेवळा तर मुलांमध्ये ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव विजय ठरला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. दिलीप चौधरी व शाळेतील खेळाडूंनी परिश्रम घेतले.