पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो. से.हायस्कूलने तालुक्यातून प्रथम येण्याची आपली परंपरा कायम

एस.एस.सी परीक्षेत तालुक्यातून प्रथम गो. से. हायस्कूलच!

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. गो. से.हायस्कूलने तालुक्यातून प्रथम येण्याची आपली परंपरा कायम राखली असून या वर्षी देखील गो. से.हायस्कूलच्या सिद्धम धीरज विसपुते या विद्यार्थ्याने ९७.६ टक्के गुणांसह तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
शाळेतून प्रथम पाच विद्यार्थी-
सिद्धम धीरज विसपुते- ९७.६,श्रुती प्रवीण शिंपी ९७.४,श्रावणी सतीश सोमवंशी ९६ ,हर्षदा बाळकृष्‍ण धुमाळ ९५.६
,शितल बाळू बोरुडे ९४.२ या परीक्षेसाठी एकूण ४३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा एकूण निकाल ९५.५९ टक्के जाहीर झाला असून विशेष प्राविण्यासह २२७ तर प्रथम श्रेणी सहज १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आले आहेत.
सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव महेश देशमुख
व्हा. चेअरमन व्ही.
टी. जोशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, स्थानिक चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर पाटील,अजय अहिरे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेले. विद्यार्थी पालक व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे