जिल्हा परिषद पंचायत समिती सांभाव्य निवडणूकीचे पडघम वाजले

जिल्हा परिषद पंचायत समिती सांभाव्य निवडणूकीचे पडघम वाजले

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) गेली चार वर्षे होऊनही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका न झाल्याने प्रशासकाच्या हलगर्जीपणा मुळे ठप्प झालेली कामे आता सुरळीतपणे चालू राहण्यासाठी न्यायालयाच्या चार महिन्यांच्या आत निवडणूका घेण्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीचे जोर जोरात पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १५ मे ला नोटीस जारी , ३० मे पर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती गट गणाच्या हद्दी निश्चित करण्यात येणार.५ जूनला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट गणाचे आरक्षण जाहीर होणार .१० जून पर्यंत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या प्रारूप याद्या जाहीर होतील.२५ जून ते ५ जुलै या तारखे दरम्यान आदर्श आचारसंहिता लागू होईल.१० ते २० जूलै नामनिर्देशन पत्र भरण्यासाठीची मुदत दिली जाईल.२५ जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. आणि २७ जुलै ला मतमोजणी होउन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नवे कारभारी जाहीर होतील या प्रमाणे सांभाव्य जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुक कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. ही फक्त वर वरची जुजबी माहिती आहे.या संदर्भात निवडणुक आयोग रीतसर पत्रकार परिषदे घेऊन घोषणा जाहीर करणार आहे.जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुढग्याला बाशिंग बांधून बसलेल्या हवशा नवश्या उमेदवारांच्या पुढील निवडणुकीच्या लगीनघाईच्या अक्षदा वाटण्यासाठी ही गोपनीय माहिती दिली आहे. परंतु गुन्हेगारीचे व्रुत्तीची पार्श्वभूमी असलेल्या आणि ज्यांच्या वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये असा सुर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात उमटू लागला आहे. त्यामुळे साळसूद पणाचा पोकळ आव आणून निवडणूक लढविणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.ज्यांची निवडून येण्याची लायकी नाही आणि सर्व सामान्य लोकांना सतत मग्रुरीची भाषा वापरणारे महाभाग सुद्धा आता मीच खरा नेता आहे अशी बोगस बतावणी करून निवडणूक लढविण्याची पोपटा प्रमाणे मतदारांशी गोडभाषा बोलू लागले आहेत. आणि निवडून आले की मतदारांवर सुड उडविणारे आता बील्ल्या मांजरी वाणी सर्व सामान्य लोकांच्या मतदानाच्या गोळ्या वर डोळा ठेवून बसले आहेत.