श्री. गो. से. हायस्कूल मध्ये यंदा आगमन पद्मराजा श्री गणेशाचे

श्री. गो. से. हायस्कूल मध्ये यंदा आगमन पद्मराजा श्री गणेशाचे

 

 

. पद्मराजा या नावातून सर्व गुणांनी युक्त व कमळफुलासारखा पवित्र आणि ज्ञानी आहे हे रूप,दर्शविलेजाते.*श्री क्षेत्र पद्मालय हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे, जे महाभारतकाळापासून अस्तित्वात आहे. *•पद्मालय,ज्याचा अर्थ “कमळाचे घर” असा होतो. या मंदिरात डाव्या आणि उजव्या सोंडेची दोन स्वयंभू गणपती मूर्ती एकाच व्यासपीठावर स्थापित आहेत, जे जगातील एकमेव असे मंदिर मानले जाते. हे मंदिर भारतातील” गणपतीचे अर्धा पीठ म्हणूनही ओळखले जाते”. गणपतीला कमळावर बसवलेले जिथे दाखवले जाते तिथे सुख-समृद्धी नांदेल असा अर्थ होतो.*

हाच आशय घेऊन श्री. गो. से हायस्कूल पाचोरा या शाळेतील कलाशिक्षक सुबोध कांतायन सर यांनी कमळावर बसलेला गणेशा व श्री क्षेत्र पद्मालय चे मंदिर मंदिर आणि समोरील तलाव व त्यातील उमललेली कमळाची फुलं इतकी सुंदर रित्या साकारली आहेत की

आपण प्रत्यक्षात मंदिराच्या समोर उभे आहे असे जाणवते. मंदिराच्या तलावाचे पाणी आणि त्यात कमळाची फुल बघीतल्यास दुरचा भास जाणवतो. काही कमळ नुकतेच उमलल्यासारखे जाणवत आहे. त्यातच तलावात आमोद-प्रमोद गणेशाचे दर्शनही होते.

सुबोध कांतायन सर दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर गणेशाची कलाकृती साकारतात.शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये कला विषयाविषयी आदर व गोडी निर्माण होते.

*पिटीसी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भाऊसो दिलीप वाघ, चेअरमन नानासो संजयजी वाघ,शालेय समिती चेअरमन मा.दादासो.श्री.खलिल देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन श्री वासुभाऊ महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील, उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील, पर्यवेक्षक सौ.ए.आर. गोहील, श्री.आर.बी.तडवी, श्री. आर. बी. बांठिया, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख श्री. एम. बी. बाविस्कर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख श्री.एम. टी.कौंडिण्य, कार्यालय प्रमुख श्री.अजय सिनकर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कांतायन सरांना विविध कलाकृती निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले.