के सी इ अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

के सी इ अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

 

 

के सी इ अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा. डॉ. संजय सुगंधी यांनी डॉ. यस. आर. रंगनाथन यांचे प्रतिमेला पुप्षहार अर्पण केला. तसेच या प्रसंगी प्रा.डॉक्टर . सी.यस. पाटील, प्रा. कल्पेश महाजन, . ग्रंथपाल श्री. गणेश नेवे, उपस्थित होते. प्रा. विजय एन. चौधरी यांनी डॉ. यस. आर. रंगनाथन यांचे जीवन कार्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवणं, त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. ज्याआधारावरच ग्रंथालयशास्त्राचा पाया रचला गेला आहे. भारतातच नाही तर जगभरातल्या सर्वच ग्रंथपालांना रंगनाथन यांच्या तत्त्वांचा अभ्यास करावाच लागतो. ग्रंथालयशास्त्र म्हटलं की डुई डेसिमल वर्गीकरणाचे जनक मेलविल डुई आणि डॉ. एस. आर. रंगनाथन या दोघांचं नाव सर्वांत आधी घेतले जातं. आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जी काही प्रगती झालेली दिसत आहे त्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान डॉ. एस. आर. रंगनाथन यांचं आहे. त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हटलं जातं.

 

या प्रसंगी ग्रंथलय शाश पंचसूत्री या विषयी मार्गर्दर्शन करण्यात आले.

1. ग्रंथ हे उपयोगी आहे.

2. प्रत्येक वाचकला ग्रंथ मिळाला पाहिजे.

3. प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे.

4. ग्रंथपाल आणि वाचकांचा वेळ वाचला पाहिजे.

5. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे.

 

या प्रसंगी महविद्यलातील सर्व विभाग प्रमुख प्रा. पी.डी. कुलकर्णी, प्रा. जगदीश पाटील, प्रा. शेवाळे मॅडम, प्रा. हर्षा देशमुख प्रा. दर्शन ठाकुर, प्रा. अविनाश सूर्यवंशी , प्रा. डॉक्ट. विना भोसले , प्रा. दिनेश अहिरराव, व सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

श्री. दिनेश सावदेकर, श्री. धनराज वाणी यांनी कार्यक्रमाच्या येशस्वीसाठी परिश्रम घेतले.