गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दैदिप्यमान यश….!!!!!!

भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील मल्लांनी जिल्हा क्रीडा कार्यालय व भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ खेळाडूंनी विविध गटात विजेतेपद तर ५ खेळाडूंनी उपविजेतेपद प्राप्त केले आहे,विजयी खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे….!!!!

१४ वर्षाआतील (मुले)

ओमकार श्रीराम पाटील (३८ कि.प्रथम)
भावेश जितेंद्र पाटील (५७ कि.प्रथम)

१४ वर्षाआतील (मुली)

कु.तनु वाल्मिक पाटील (४६ कि.प्रथम)

१७ वर्षाआतील,फ्रीस्टाईल (मुले)

कमलेश मनोज पाटील (४१ ते ४५ कि.प्रथम)
जयदीप कैलास सोनवणे (५५ कि.प्रथम)
सुनिल भाऊसाहेब फासगे (७१ कि.प्रथम)
भावेश मच्छिंद्र पाटील (४८ कि.द्वितीय)
यश विकास पाटील (६० कि.द्वितीय)

१७ वर्षाआतील ग्रीकरोमन (मुले)

मोहन भाऊलाल हटकर (५१ कि.प्रथम)
स्वराज प्रल्हाद चौधरी (५५ कि.प्रथम)
तुषार सावता पाटील (४१ कि.द्वितीय)

१७ वर्षाआतील (मुली)

कु.पुजा भक्तराज महाजन (३६ ते ४० कि.प्रथम)
कु.नंदिनी लक्ष्मण सुर्यवंशी (४६ कि.द्वितीय)
कु.पायल गोविंदा सुर्यवंशी (५७ कि.द्वितीय)

१९ वर्षाआतील फ्रीस्टाईल (मुले)

धिरज शरद पाटील (५७ कि.प्रथम)
अक्षय भगवान माळी (७४ कि.प्रथम)

१९ वर्षाआतील ग्रीकरोमन (मुले)

सुमीत सुरेश केदार (५५ कि.प्रथम)
निवृत्ती ईश्वर पवार (६१ कि.प्रथम)

१९ वर्षाआतील (मुली)

कु.पायल कैलास सोनवणे (५० कि.प्रथम)

स्पर्धेत घवघवीत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,कार्यवाहक रघुनाथ पाटील,रावसाहेब पैलवान,शरद पैलवान,बिऱ्हाडे पैलवान,बच्चू पैलवान,भावडू पैलवान,बापू.पैलवान,वाल्मिक पैलवान,महेंद्र पैलवान,कैलास पैलवान,सुनिल पैलवान,सुनिल बिऱ्हाडे,मनोज पैलवान,जितेंद्र पैलवान,अण्णा पैलवान,प्रल्हाद पैलवान,सयाजी मदने,संतोष कराळे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील,तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.