५९वी पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा खो-खो निवड चाचणी स्पर्धा

_५९वी पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा खो-खो निवड चाचणी स्पर्धा….!!!!_

जळगाव – महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनने २०२३-२४ या वर्षाची पुरुष / महिला विभागाची ५९ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा परभणी येथे आयोजित केली आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे सन २०२३ २४ ची पुरुष / महिला गटाची निवड चाचणी व स्पर्धा रविवार दि. ०५/ ११ / २०२३ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव जिल्हा क्रीडा संघ मैदानावर घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी माजी आ. चंद्रकांत सोनवणे, प्रा. डी. डी. बच्छाव, गणपतराव पोळ, उदय पाटील, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर, सुनिल समदाणे, जयांशू पोळ, सौ. विद्या कलश्री यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- १) राहुल पोळ – ९४०४२९२७१४, २) अनंता समदाणे- ९४०३५१४५८६, ३) एन. डी. सोनवणे – ९४२०३८८८५१, ४) दत्ता महाजन- ७२०७५१८२३, ५) विशाल पाटील – ९९७०३०८३२६