चोपडा महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी ‘कै.मा.ना.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात २५ जानेवारी रोजी ‘कै.मा.ना.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वकृत्व मंडळातर्फे दि.२५ जानेवारी रोजी माजी शिक्षणमंत्री कै.मा.ना.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘राज्यस्तरीय वरिष्ठ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. दि.२५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन होईल.
या स्पर्धेसाठी ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान’, ‘संत तुकोबाराय यांनी अभंगातून केली अंधश्रद्धा भंग’, ‘सौर ऊर्जा वापर काळाची गरज’, ‘जाती-धर्मापेक्षा देश श्रेष्ठ’ आणि ‘भौतिक सुविधांच्या विळख्यात जपावे आरोग्य’ असे विषय देण्यात आले आहेत. या पाच विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकाला वक्तृत्व सादर करता येईल. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये ५०००/-, ३०००/-, २०००/- व १०००/-रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील कोणत्याही वरिष्ठ महाविद्यालयाचा एक स्पर्धक सहभागी होऊ शकतो. सदर स्पर्धा नि:शुल्क असल्याने राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे तसेच वक्तृत्व मंडळ प्रमुख डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी ९८३४३३२७७२ या नंबरवर संपर्क साधावा.