शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा PM SKILL RUN स्पर्धा संपन्न

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा PM SKILL RUN स्पर्धा संपन्न

 

कौशल्य विभाग, महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग आयोजित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा PM SKILL RUN स्पर्धेचे आयोजन पाचोरा शहरात दिनांक १७/०९/२०२३ रोजी
सकाळी ७:०० वा. आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी माननीय पोलीस निरीक्षक राहुलजी खताळ साहेब यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा उंचावण्यात आला व मॅरेथॉन मार्गस्थ झाली स्पर्धेची सुरुवात राजे संभाजी महाराज चौक ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा येथे समाप्त झाले या स्पर्धेत महिला व पुरुष असे दोन गट असून प्रत्येक गटाला
प्रथम पारितोषिक रुपये 3000
द्वितीय पारितोषिक रुपये 2000 व तृतीय पारितोषिक रुपये 1000
अशी वितरित करण्यात आले पुरुष गटात प्रथम क्रमांक जलाल सलामत तळवी द्वितीय क्रमांक अश्विन भास्कर शिंदे तर तृतीय क्रमांक अमोल धनराज पाटील यांनी पटकावले तसेच महिला गटात प्रथम क्रमांक दिपाली शिवाजी पाटील द्वितीय क्रमांक जागृती विजय पाटील तर तृतीय क्रमांक चैताली विठ्ठल पाटील यांनी पटकावला स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शन व प्रमुख अतिथी माननीय श्री प्राध्यापक मनोहर श्रीराम पाटील क्रीडा संचालक लाभले स्पर्धेचे नियोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य माननीय शिवकुमारजी जुमनाके यांच्या नेतृत्वात संस्थेचे प्रभारी गटनेदेशक श्री व्ही जी भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लिपिक गौतम गरुड व गोकुळ चौधरी निदेशक वर्ग सौ टी पी पाटील मॅडम, श्री मनोज पाटील सर, श्री चेतन पाटील सर, श्री चेतन महाजन सर, श्री मनीष भावसार सर, श्री मिस्तरी सर, श्री गायकवाड सर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री खरारे दादा, श्री बागवान दादा व मोरे ताई तसेच संस्थेचे सुरक्षारक्षक श्री पाटील दादा श्री मिसाळ दादा श्री लोहार दादा या सर्वांच्या अथक परिश्रमाने pm skill run स्पर्धा उत्साहात पार पडला.