निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा जल्लोष…!
पाचोरा – तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
लहानग्या चिमुकल्यांनी श्रीकृष्ण व राधा यांची नटखट व निरागस वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे मन मोहून टाकले. मुलांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. विशेष आकर्षण ठरलेली वेशभूषा स्पर्धा अत्यंत रंगतदार व उत्साही वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. फरिदा भारमल, सौ. वर्षा पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षकांच्या परिश्रमांमुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
पालकांनीही लहानग्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले.