सौ वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत युवकांनी शिवसेना उबाठा पक्षाचा भगवा घेतला हाती

सौ वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत युवकांनी शिवसेना उबाठा पक्षाचा भगवा घेतला हाती

बाळासाहेबांच्या विचारांनी गोरगरिबांची समाजसेवा करा- वैशालीताई सुर्यवंशी

पाचोरा: येथील युवकांचे माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिनांक 22. 10. 2023 रोजी सायंकाळी काळी 06:00 वाजता भगवा रुमाल घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल करून घेतले हा कार्यक्रम शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पाचोरा येथे संपन्न झाला. पक्षप्रवेश सोहळ्यात मार्गदर्शन करताना माननीय वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, आपण शिवसेना पक्षातील कुटुंबाचे सदस्य झालात याचा मला मनापासून आनंद वाटतो म्हणून तुम्ही सर्वांचे मनापासून अभिनंदन. करते स्वागत करते. आपण ज्या विश्वासाने आलात त्याचा सन्मान आदर सदैव केला जाईल आपण सर्वांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 80% समाजकारण व 20%राजकारण हा महामंत्र ध्यानी घेऊन गोरगरीब मायबाप जनतेची सेवा करावी. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मात्र दररोज दोन तास संघटना बांधणी करा. प्रत्येक दोन तारखेला मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कार्यालयावर असतं तिथं गरजू लोकांना पाठवा. सेवेची संधी द्या. उद्योग करा.व्यवसाय करा. शरीर सांभाळा. परिवाराची काळजी घ्या.भूलथापांना बळी पडू नका. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. शिवतीर्थ शिवसेना कार्यालय तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. व्यसनापासून दूर राहा. निरोगी व आनंदी जीवन जगा. आपल्या हातून समाजाची सेवा घडावी या कामे आई भवानी आपणास उदंड आयुष्य व बलदंड शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रवेश करणारे मानकरी उमेश हटकर, (बंटी) अविनाश राठोड, दीपक हटकर, आतिश हटकर, मंगेश कुमावत, सोनल गयासिमन्दर, वैभव भावसार, अजय जाधव, सागर राठोड, विकी राठोड, भारत राठोड, स्वप्निल हटकर, विठ्ठल हटकर, यश हटकर, अजय हटकर, संकेत गायसिमंदर, सचिन हटकर, भूषण हटकर, अजय हटकर, राहुल हटकर, यश हटकर, गणेश हटकर, शुभम हटकर, सागर हटकर, विशाल हटकर, विशाल कुमावत, हर्षल हटकर, मनोज हटकर, अंकुश हटकर, गजानन हटकर, रवींद्र हटकर, विजय हटकर (भाऊडू), सुनील पाटील, रुपये हटकर, यश शेलार, अश्विन हटकर, विनायक लकडे, विनोद राठोड, भूषण हटकर, अजय पवार, प्रवीण हटकर, तुळशीराम हटकर, प्रवीण हटकर होते याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख उद्धव भाऊ मराठे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे मार्गदर्शन केले आणि उमेश हटकर (बंटी भैया), शशी पाटील व राजेंद्र राणा यांनी आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख एडवोकेट दीपक पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, भरत भाऊ खंडेलवाल, युवा अधिकारी मनोज चौधरी, गफार भाई, अभिषेक खंडेलवाल, पप्पू जाधव, किरण राजपूत, गौरव पाटील, दीपक शिवाजी शेळके, नामदेव चौधरी, अजय पाटील, संतोष पाटील सर, नंदू सर गोकुळ गांगुर्डे, राजीव गायकवाड धरमसिंग पाटील शुभम राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन आभार नाना वाघ यांनी केले.