गो.से.हायस्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रम संपन्न

गो.से.हायस्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रम संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त कार्यक्रम कृषी अधिकारी श्री. जाधव साहेब व श्री. चौधरी साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी श्री.जाधव साहेब यांनी तृणधान्याचे आरोग्यास फायदे विशद केले. श्री.चौधरी साहेब यांनी आहारात तृणधान्य समाविष्ट करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ मॅडम यांनी पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून दिले. पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे सर व शिक्षिका सौ. एस. टी. पाटील मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील सर, श्री. ए.बी. अहिरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर बी. तडवी सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम.एन. देसले सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. आर. बी. तडवी सर यांनी केले.