किरकोळ कारणावरून पाचोऱ्यात २३ वर्षीय युवकाचा खुन ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून पाचोऱ्यात २३ वर्षीय युवकाचा खुन

मोटरसायकलला कट लागल्याच्या कारणावरुन हाणामारी
८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
५ जणांना पाचोरा पोलिसांनी केली अटक

पाचोरा, प्रतीनीधी
दि. ३० रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान शहराच्या पुनगाव रस्त्यावरील बुऱ्हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात तरुणांच्या झालेल्या हाणामारीत एका २३ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता त्यास पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले. दरम्यान जखमी तरुण हा मयत झाला. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार दि. ३० रोजी पाचोरा येथे भडगाव रोड वरील साई मंदिरा जवळ या घटनेतील मयत भूषण नाना शेवरे (वय – २३) रा. दुर्गा नगर, पाचोरा याचे व आरोपी लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे (वय – २२) याचे वाहनाचा कट लागल्यावरुन वाद झाला होता. दरम्यान लोकेश उर्फ विकी याने भुषण नाना शेवरे यास पुनगाव रोडवरील बुर्‍हानी इंग्लिश मिडियम स्कूल परिसरात सात वाजेच्या सुमारास फोन करून बोलवले होते. याठिकाणी लोकेश उर्फ विकी शामराव पाटील, मयुर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहुल उर्फ माॅडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश ऊर्फ भद्रा सुरेश पाटील, पवन पाटील (पुर्ण नाव माहीत नाही) व मयत भूषण नाना शेवरे यांच्यात तुंबळ हाणामारी झाली दरम्यान भुषण शेवरे याचे पोटात तीक्ष्ण हात्याराने वार करून त्यास गंभीर जखमी करण्यात आले. भुषण यास गंभीर जखमी अवस्थेत उपचारार्थ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेले असता भुषण याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन या प्रकरणी पाचोरा पोलिसात आरोपी लोकेश उर्फ विकी शामराव पाटील, मयुर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहुल उर्फ माॅडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश ऊर्फ भद्रा सुरेश पाटील व पवन पाटील (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पाचोरा या ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील लोकेश शिंदे, मयुर पाटील, राकेश चौधरी, सागर पाटील, अविनाश पाटील या ५ जणांना अटक केली असून उर्वरित राहुल पाटील, चेतन पाटील व पवन पाटील यांचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे करीत आहे.