जाधव संकुल, म्हाडा कॉलनी परिसरात “मान हळदी-कुंकवाचा आणि सन्मान सौभाग्याचा” कार्यक्रम उत्साहात साजरा केला

भोर टाऊनशीप, जाधव संकुल, म्हाडा कॉलनी परिसरात “मान हळदी-कुंकवाचा आणि सन्मान सौभाग्याचा” कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

भोर टाऊनशीप, जाधव संकुल, म्हाडा कॉलनी, चुंचाळे शिवार अंबड-सातपूर लिंकरोड परिसर येथील मातोश्री लक्ष्मीबाई बाळू भोर या शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात मकर संक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पडला. श्रीमती लक्ष्मीबाई बाळू भोर माध्यमीक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती प्रियंकाताई हासे मॅडम आणि सामाजिक कार्यकर्त्या तथा भाजपाच्या सदस्या मा.सौ. धनश्रीताई कुलदीप नेवरे (सैंदाणे) यांच्या सौजन्याने परिसरातील सर्व महिलांना एकत्र करून *मान हळदी कुंकवाचा-सन्मान सौभाग्याचा* अशी टॅग लाईन वापरत हळदी कुंकवाच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हळदी-कुंकू बरोबरच विवीध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात मुख्यतः रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा आणि उखाणाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विजेत्यांना सप्रेम भेट देऊन गौरविण्यात आले. आणि तसेच हळदी-कुंकवांचे महिलांना वान देऊन नवीन वर्षाचे कोळी महासंघ नाशिक शहर कडून दिनदर्शिका (कॅलेंडर) वितरण केले.
या प्रसंगी सौ. मनिषा भोर, सौ. ज्योती भोर, सौ. सुगंधा सोनवणे, सौ. आशा सौंदाणे सौ.बगळेताई आणि श्रीमती लक्ष्मीबाई बाळू भोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षीका आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी उपस्थित होते.