श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

पा.ता.सह.शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आज दि. 14 एप्रिल सोमवार रोजी सकाळी 8 वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर. यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.

शालेय व्यवस्थापन समिती चे चेअरमन दादासो.श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो.श्री.वासुदेव महाजन,मुख्याध्यापक श्री. एन.आर.पाटील,उपमुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील,तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर संगीत शिक्षक श्री.सागर थोरात यांनी पंचशील प्रार्थनेचे पठण करून महामानवास वंदना दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.श्री.खलीलदादा देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्श विचारांचा मागोवा घेतला.

वक्तृत्व व रंगभरण स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री.डी. डी.कुमावत व श्री.रुपेश पाटील यांनी परीक्षण केले. तसेच रंगभरण स्पर्धेसाठी कला शिक्षक श्री.एस.डी.भिवसने,श्री.सुबोध कांतायन,श्री.प्रमोद पाटील व कला शिक्षिका सौ.जे.एन.ठाकरे मॅडम यांनी काम बघितले.

कार्यक्रमास मंचावर शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन दादासो.श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे प्रमुख अण्णासो.श्री. वासुदेव महाजन,मुख्याध्यापक श्री.एन.आर. पाटील,उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील,पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे,सौ. अंजली गोहिल मॅडम श्री.आर.बी.तडवी, सांस्कृतिक समीती प्रमुख श्री.महेश कौंडीण्य,टेक्निकल विभागाचे प्रमुख श्री.एस.एन.पाटील. किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनीष बाविस्कर,कार्यालय अधीक्षक श्री.अजय सिनकर,तसेच सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.बी.बोरसे व आभार प्रदर्शन श्री.रुपेश पाटील यांनी केले.