अखेर एक महिन्यात (खरीप 2020) चा पिकविमा नुकसान भरपाईचे ४ कोटी ७० लाख देण्याचे दिले कृषि विभागाचे लेखी पत्र

अखेर एक महिन्यात (खरीप 2020) चा पिकविमा नुकसान भरपाईचे ४ कोटी ७० लाख देण्याचे दिले कृषि विभागाचे लेखी पत्र

——————–
खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या ठीय्या आंदोलनाचा दणका
——————
शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने चार तास दणाणले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय
——————-
जळगाव — जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांचे सुमारे 4 कोटीं 70 लाखपेक्षा अधिक रक्कम प्रलंबित होती.वारंवार पत्र देऊन देखील कृषी विभाग गांभीर्याने घेत नसल्याने अंतीम इशारा पत्र देऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पत्रान्वये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दिला होता. एक तर विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा किंवा विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या नाही तर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ठिय्या आंदोलन केले. खासदार उन्मेशदादा पाटील यांचे नेतृत्वात पाच तास सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला रात्री दहा वाजता राज्याचे कृषिमंत्री यांच्या आदेशाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका महिन्यात (मार्च 2020) अखेर प्रलंबित विमा नुकसान भरपाई रक्कम मिळवून देण्यासंदर्भात पत्र दिल्याने जिल्ह्यात लवकरच खरीप 2020 चा प्रलंबित पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने खासदारांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
*पाच तासाच्या या आंदोलनाची यशस्वी अखेर* जवळपास 10 हजार 140 शेतकऱ्यांना जवळपास 4 कोटी 70 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हजारो उन्मेशदादा पाटील यांच्या खंबीर भूमिकेचे कौतुक केले आहे.
घोषणाबाजीने परिसर दणाणला
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी *भरपाई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची* परीसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळ,पाचोरा भाजपचे तालुकाध्यक्ष युवा नेते अमोलभाऊ शिंदे, भाजपा जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, पंचायत समितीचे सदस्य मिलिंद चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, जेष्ठ कार्यकर्ते सचिन पवार, गिरीश वराडे, बबलू पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाईग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते.
प्रचंड घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी व पुढे नेत्यांनी परिसर दणाणून सोडल्याने जिल्हाभरात या ठिय्या आंदोलनाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होते. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेले पत्र व्हायरल करीत आनंद व्यक्त केला आहे.