पत्रकार व आमदाराच्या वादात निषेध ही नाही व समर्थन ही नाही : मा दिलीप वाघ

पत्रकार व आमदाराच्या वादात निषेध ही नाही व समर्थन ही नाही : मा दिलीप वाघ

पाचोरा ( प्रतिनिधी ) येथील पाचोरा भडगाव मतदार संघातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला, या घटनेचा तालुका व जिल्हा सह संपूर्ण राज्यात सर्व पक्षीय व सामाजिक संघटना राजकीय नेते यांच्यातर्फे निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले, मात्र या घटनेतील मुख्य आरोपी याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी प्रत्येक स्तरातून करण्यात येत आहे. दुसरीकडे या घटनेबाबत आमदार किशोर पाटील व पत्रकार संदीप महाजन यांच्यामध्ये शिवीगाळ व मारहाण यासारख्या घटना घडुन आल्या या घटनेचा देखील संपूर्ण राज्यभरात निषेध केलं जातं आहे, या घटनेला आगळे वेगळे रूपांतर पाहावयास मिळत आहे. या घटनेत त्या बालिकेला व तिच्या कुटुंबीला न्याय देणं अत्यंत गरजेचे असल्याने आमदार किशोर पाटील व संदीप महाजन या दोघांनीही दोन दोन पाऊल मागे येऊन कुठेतरी हे प्रकरण थांबविणे गरजेचे आहे. असे माजी आ दिलिप वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले की यासाठी मी स्वतः आमदार किशोर पाटील व संदीप महाजन यांच्यात मध्यस्थीस करून हे प्रकरण कुठेतरी थांबवा अशी विनंती करणार आहे. कारण या प्रकरणामुळे पाचोरा भडगाव मतदार संघात चे नाव राज्यभर वेगळ्या रूपाने चर्चिले जात आहे. यावेळी न पा मा .गट नेते संजय वाघ माजी नगरसेवक भूषण वाघ शशिकांत चंदिले रंजीत पाटील सुनील पाटील खलील देशमुख अझर खान सुदर्शन महाजन विनोद पाटील बंटी माळी गोपी पाटील राज जगताप हे उपस्थित होते.