गोपीचंद पुना पाटील,विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागताने नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात

गोपीचंद पुना पाटील,विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागताने नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात

कोळगाव (भडगाव) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२३ चे विद्यार्थांना प्राचार्य सुनिल पाटील तसेच पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या हस्ते नवीन पाठ्यपुस्तके तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत त्यांना मिष्ठान्न भोजन देऊन मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते,इयत्ता पाचवीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक होता.
प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.ए.वाघ यांनी तर चेतन भोसले यांनी आभार मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.