पाचोरा तालुका आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती तर्फे पाचोरा येथे नविन रूजु झालेले प्रांताधिकारी यांचा सत्कार व प्रमाणपत्र निमित्त निवेदन

पाचोरा तालुका आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती च्या सर्व पदाधिकारी तर्फे आदिवासी दिनाच्या निमित्ताने पाचोरा येथे नविन रूजु झालेले प्रांताधिकारी यांचा सत्कार करुन,,,प्रमाणपत्रासाठी निवेदन देण्यात आले

पाचोरा तालुका बातमी सेवा श्री राजेंद्र खैरनार

(पाचोरा): ९ ऑगस्ट २०२३ आदिवासी जागतिक दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, पाचोरा येथे आज आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती चे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी पाचोरा येथे नविन रूजु झालेले प्रांताधिकारी श्रीयुत आहिरे साहेबांचा सत्कार करून कोळी समाजाच्या प्रमाणपत्र संदर्भात प्रांताधिकारी श्रीयुत आहिरे साहेबांसोबत येणाऱ्या अडीअडचणी , प्रमाणपत्र कसे उपलब्ध होतील यावर समिती च्या जेष्ठ पदाधिकारी सोबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य चे आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांना पण पाचोरा प्रांताधिकारी,(उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा.) यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात विषय जागतिक आदिवासी दिनानिमित्त व क्रांतीदिन निमित्त राज्यातील १ कोटी आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ निषेध…
मा.महोदय राज्यातील १ कोटी ३० लाख आदिवासी अनुसुचीत जमातींपैकी १ कोटी आदीवासींवर घटनादत्त सोई सवलतीबाबत अन्याय होत आहे. या १ कोटी आदीवासींच्या संख्येवर राज्य व केंद्रसरकारचा निधी मिळतो, मतदार संघ अनुसुचीत जमातीकरीता राखीव होतात. विकास योजना आखल्या जातात परंतु त्यांना अनुसुचीत जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र नाकारले जातात व अनुसुचीत जमातीच्या या ४५ पैकी ३५ ते ४० अनुसुचीत जमातीचे घटनादत्त अधिकार नाकारल्या जातात.

राज्यभरात अनेक आंदोलनाद्वारे राज्य शासनाच्या हि बाब निदर्शनास आणून देवूनही शासनाचे वतीने कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नाही. म्हणून शासन व प्रशासनाचे या घटनाबाह्य कृतीचा आम्ही राज्यभर आदिवासी दिन व क्रांतीदिनानिमीत्त जाहिर निषेध करीत आहोत. तरी आमच्या प्रश्नांची दखल घेवून मा.मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ बैठक आयोजित करावी, अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर मोठे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात येत आहे. यावेळी आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती पाचोरा तालुका चे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. संभाजी दादा शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले उपस्थित असलेले पदाधिकारी
श्री. संभाजी बाजीराव शेवरे (आदिवासी कोळी महासंघ संंघर्ष समिती जळगांव जिल्हा उपाध्यक्ष), श्री.दशरथ नामदेव जाधव (आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती पाचोरा तालुका अध्यक्ष) ,
श्री.आत्माराम आबा जाधव (रिटायर तहसिलदार, आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती पाचोरा तालुका क्षेत्र प्रमुख) ,
श्री विजय बागुल (फौजी, आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती पाचोरा तालुका उपाध्यक्ष),
श्री.राजेंद्र खंडु मोरे (सर) (पाचोरा तालुका सचिव),
एड.श्री शांतीलाल अमृत सैंदाणे(पाचोरा तालुका जेष्ठ सल्लागार),
श्री अशोक पिराजी महाले (सह सल्लागार पाचोरा तालुका),
श्री.अनिल सावळे सर (भडगांव तालुका अध्यक्ष)
श्री.पि. के. सोनवणे (पाचोरा शहराध्यक्ष),
श्री राजेंद्र अर्जुन खैरनार (आदिवासी कोळी महासंघ संघर्ष समिती पाचोरा तालुका प्रसिद्धी प्रमुख, पत्रकार) ,
श्री.किशोर रायसाकडा(पत्रकार) ,
श्री प्रविण मोरे (सह प्रसिद्ध प्रमुख),
श्री सचिन बुधा कोळी (युवा सेना अध्यक्ष),
श्री कैलास झिपरु आमले (सदस्य) ,
श्री .ईश्वर महादू महाले (सदस्य),श्री दिपक आत्माराम जाधव (सदस्य), श्री.राजेंद्र कोळी (जय बाबाजी) जारगांव (सदस्य),
श्री.प्रकाश फकिरा कोळी (सदस्य),श्री.संजय नारायण शेवरे (सदस्य),श्री रविन्द्र सुभाष कोळी (सदस्य), श्री.अशोक आमले (पुनगांव अध्यक्ष),श्री.नाना फकीरा कोळी (सदस्य), श्री.सुनिल कोळी (लोहटार अध्यक्ष),श्री.प्रविण बोरसे पत्रकार (सदस्य)श्री.सुनिल कोळी ( राणीचे बांबरुड ग्रामीणअध्यक्ष),श्री.संतोष(बापु) अर्जुन मोरे (सदस्य).