दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटपासाठी पाचोरा येथे खा. उन्मेश पाटील व अमोल शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटपासाठी पाचोरा येथे खासदार उन्मेशदादा पाटील व अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रयत्नातून मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा –
भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्यामार्फत पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ईडीपी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपासाठी दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरांत आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना लवकरच कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात येणार असून या शिबीरात शेकडो दिव्यांगांनी आपली नाव नोंदणी केली आहे.
अपंगाना दिव्यांग संबोधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मसन्मान केल्याचा सर्वांना अभिमान असून आता दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी कोट्यवधीच्या उपकरणांचे वाटप जळगाव लोकसभा मतदारसंघात करण्यात येणार असून योग्य व्यक्तीस त्याला हवे असलेले उपकरणे देण्यासाठी शिबिराचे आयोजन केले असून या उपकरणातून आपणास आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.असे प्रतिपादन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.
पाचोरा तालुक्यातील दिव्यांगांसाठी आयोजित या शिबिरासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या सततच्या पाठपुराव्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी खासदार पाटील यांचे आभार मानत शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेणाऱ्या प्रशासनातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांच्यासह शिबिरामध्ये स्वयंसेवक म्हणून सहकार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा शहर व ग्रामीणच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे देखील आभार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे, पालिकेचे उपमुख्यधिकारी प्रकाश भोसले,जिल्हा पुनर्वसन अधिकारी एस पी गणेशकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन गोविंद शेलार यांनी तर बन्सीलाल पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष वर्षाताई पाटील शहराध्यक्ष कपिल जाधव,प्रदीप पाटील,दीपक माने,समाधान मुळे,वीरेंद्र चौधरी,भैया ठाकूर, जगदीश पाटील,प्रशांत सोनवणे, रिंकू जैन रवींद्र देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.