कु.दिव्या मुकेश बारी ही शारदाश्रम विद्यालय कोल्हे नगर जळगाव या शाळेची विद्यार्थिनी शालेय सिकई मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत जिल्हा पातळीवर अजिंक्य पद पटकावून सुवर्ण पदक

यशवंत हो जयवंत हो त्रिवार हार्दिक अभिनंदन

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव विभाग माजी विभागीय सचिव, विभागीय संघटक कॉ.मुकेश बारी यांची कन्या कु.दिव्या मुकेश बारी ही शारदाश्रम विद्यालय कोल्हे नगर पश्चिम जळगाव या शाळेची विद्यार्थिनी असून महाराष्ट्र राज्य सरकार च्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तर्फे महानगर जिल्हा पातळीवर आयोजित विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी होऊन शालेय सिकई मार्शल आर्ट कराटे स्पर्धेत जिल्हा पातळीवर अजिंक्य पद पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.तिची पुढील राज्य स्तरीय स्पर्धा मुंबई येथे दि.27/11/2022 रोजी होणार आहे त्या साठी निवड झाली आहे त्या नंतर गोवा येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे
यापूर्वी संभाजी नगर येथे झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन तिने अजिंक्य पद पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे
तिच्या अद्वितीय अशा यशाबद्दल कु.दिव्या व तिचे पालक यांचे त्रिवार हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा.संघटनेस तिचा सार्थ अभिमान आहे

केंद्रीय पदाधिकारी
परिमंडळ, मंडळ विभागीय उपविभागीय शाखा पदाधिकारी, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन जळगाव