भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी 31 मे पर्यत मुदतवाढ

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनांसाठी
महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी 31 मेपर्यत मुदतवाढ

जळगाव दि. 22  :- भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनांसाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अनु.जाती, इतर मागासवर्गीय, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी 31 मे, 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरलेले नाही त्यांनी 31 मे, 2023 पर्यत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
तसेच महाविद्यालयाने सुध्दा आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नसल्यास त्यांना तात्काळ भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबत अवगत करण्यात यावे. असेही श्री. पाटील यांनी कळविले आहे.