चोपडा शहर पोलीस निरीक्षक पदी कांतीलाल पाटील स्वराज्य पोलीस मिञ आणि पञकार संरक्षण माहिती अधिकार संघटने तर्फे सत्कार

चोपडा शहर पोस्टेला पोलीस निरीक्षक पदाचा कांतीलाल पाटील यांनी स्वीकारला पदभार; स्वराज्य पोलीस मिञ आणि पञकार संरक्षण माहिती अधिकार संघटने तर्फे सत्कार

चोपडा :

चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिग चव्हाण यांची अमरावती ग्रामीण येथे बदली झाल्याने तेव्हापासून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सपोनि.अजित सावळे यांनी कामकाज पाहिले.गेल्या दोन महिन्यापासून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते.जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश केल्याने चोपडा पोलीस निरीक्षक पदी चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले कांतीलाल काशिनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.नुकतेच पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.कांतीलाल पाटील यांनी पदभार स्वीकारल्याने त्यांचा पोलीस कर्मचारी,राजकीय तसेच स्वराज्य पोलीस मिञ आणि
पञकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे पदाधिकारी,व कार्यकर्ते यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत अभिनंदन केले.याप्रसंगी संघटनेचे जिल्हा सचिव व पञकार हेमकांत गायकवाड,तालुका संघटक तथा पञकार रविंद्र कोळी,तालुका उपाध्यक्ष तथा पञकार मिलिंद वाणी,राजेंद्र पाटील अॕड.संजय पारधी उपस्थित होते.