सौ.सावित्रीबाई परशराम शिंदे,प्राथमिक शाळेत योगदिन उत्साहात साजरा

आज सौ.सावित्रीबाई परशराम शिंदे,प्राथमिक शाळेत योगदिन उत्साहात साजरा.

पाचोरा— आज सावित्रीबाई परशराम शिंदे, प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय *योगदिन सकाळी ७.०० ते ८.०० या* वेळात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला….
याप्रसंगी १) प्रार्थना,
२) पूरक हालचाली
३) योगासने -दंड स्थिती, बैठक स्थिती, पाठीवर झोपून, पोटावर झोपून करावयाची आसने,
४) कपालभाती
५) प्राणायाम -अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायम
६) ध्यान, त्रिवार ओमकार,
याप्रमाणे क्रमाने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम दरम्यान पाचोरा पंचायत समितीचे *शिक्षण विस्तार अधिकारी मा.आण्णासाहेब समाधान पाटील* यांनी भेट देवून विद्यार्थ्याचे कौतूक केले.

संपूर्ण योगाभ्यास कार्यक्रमाचे *सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री.सु.ना.पाटील सर यांनी केले,
तर गाईड म्हणून श्री.वानखेडे सर व श्रीम. सुवर्णा महाजन यांनी आसने करुन दाखविली.
अशा प्रकारे त्रिवार ओमकार व प्रार्थना घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

गिरनाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले . कार्यक्रमास *इ.१ ली ते ४ थी चे सर्व विद्यार्थी,* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.