समाज सेवक तथा पत्रकार अलीम शाह उर्फ छोटे सरकार यांची अल्पसंख्याक विकास मंडळाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

समाज सेवक तथा पत्रकार अलीम शाह उर्फ छोटे सरकार यांची अल्पसंख्याक विकास मंडळाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती

भडगाव: अल्पसंख्याक विकास मंडळाच्या भडगाव तालुका
अध्यक्षपदी येथील समाजसेवक तथा आय बी एन समाचार चे संपादक अलीम शाह उर्फ छोटे सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष शोएब खाटीक यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीवर अलीम शाह उर्फ छोटे सरकार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, तालुक्यातील अल्पसंख्याकांच्या आदी अडचणी सोडविण्यासह व विविध योजनांचा लाभ गरजूंना व गरजू पर्यंत पोहचविण्यासाठी मदत व काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अलीम शाह उर्फ छोटे सरकार हे भडगाव तालुक्यातील एक तरुण समाजसेवक आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कार्यांमध्ये भाग घेतला आहे. ते आय बी एन समाचार लाईव्हचे संपादक आहेत. त्यांनी अनेकदा अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. व खंबीरपणे अल्पसंख्याक समाजासोबत उभे असतात, अलीम शाह उर्फ छोटे सरकार यांची अल्पसंख्याक विकास मंडळाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती ही एक महत्त्वाची बाब आहे. त्यांच्या नेतुत्वाखाली तालुक्यातील अल्पसंख्याकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी तय्यार आहेत त्यांची ही नियुक्तीने सर्व समजाकडून अभिनंदन केले जात आहे व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिले जात आहे.