नगरदेवळा येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व मान्यवर कडून मार्गदर्शन

नगरदेवळा येथे दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व मान्यवर कडून मार्गदर्शन

शालय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा व मदिना मस्जिद ट्रस्ट नगरदेवला यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी व बारावी कला, विज्ञान व किमान कौशल्य शाखा मध्य गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार साठी एक कार्यक्रमचा आयोजन करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण काटकर सर उपस्थीत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल कॅरियर कौन्सलर अल्ताफ अली रहनुमा जलगाव तसेच लाईफ कोच अँड ट्रेनर एजाज एम शेख जळगाव, सिटी केअर हॉस्पिटल पाचोराचे संस्थापक डॉक्टर इमरान पिंजारी हे उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन साबीर मुस्तफा आबादी यांनी केले. कार्यक्रमाचे उद्दिष्ट परवाज अकॅडमी संस्थापक शेख जावेद रहीम यांनी मांडले. मान्यवरांचे हस्ते ट्रॉफी व फुल देऊन विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी विद्यार्थी यांनीही आपले मत मांडले. कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मदिना मस्जिद ट्रस्टचे सर्व सदस्य,अन्नू मेमबर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम गुलाम नबी, शालेय व्यवस्थापन समित उपाध्यक्ष अफरोज शेख, सदस्य मुश्ताक खान, वसीम पटवे, उमर टेलर, जुबेर खान, अश्फाक मजीद, अहतेशाम सर, इक्बाल सर, सय्यद जाकिर अली,उपस्थित शिक्षक मंडळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मध्य मौलाना जमशेद,केन्द्र प्रमुख नासीर खान,महाजन सर,कवी जुबेर अली ताबिश, शालार्थ कॉर्डिनेटर सय्यद करीम, हाजी रफिक, हाजी तालिब, सय्यद शाहिद, तोसिफ शेख आणि मोठी संख्या मध्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.