नवजीवन विद्यालय पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी वाचविले कबुतराचे प्राण

नवजीवन विद्यालय पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी वाचविले कबुतराचे प्राण

येथील नवजीवन विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी घायाळ कबुतरावर उपचार करून त्याचे प्राण वाचविले आहेत. मध्यान भोजनाच्या वेळेस या विद्यार्थ्यांना घायाळ खबुतर पटांगणात आढळले. त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षक आर ए साळुंखे, जगदीश पाटील व मनोज पाटील यांच्या मदतीने या कबुतरावर प्राथमिक उपचार केला व कबुतराला जीवदान दिले. विद्यार्थ्यांनी या कबुतराविषयी दाखवलेला दयाभाव व केलेली सुश्रुषा ही नक्कीच कौतुकास्पद असून शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी पवार सर यांनी संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन पक्षी व प्राण्यांविषयी दयाभाव ठेवावा. तसेच निसर्गाचे संगोपन करत झाडे लावून त्यांचे जतन करण्याचे आवाहन केले. ‌