प्रकाश रामदास तेली यांच्या “मन की बात” काव्य संग्रहाचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते संसद भवन नवी दिल्ली येथे प्रकाशन

प्रकाश रामदास तेली यांच्या मन की बात काव्य संग्रहाचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते संसद भवन नवी दिल्ली येथे प्रकाशन

जळगाव :- कवी लेखक व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांनी लिहिलेल्या मन की बात ह्या हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन काल दिनांक 21 जुलै 2023 रोजी संसद भवन नवी दिल्ली येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कवी प्रकाश तेली प्रसिद्ध उद्योगपती प्रितीश चौधरी, ईश्वर शिंदे, अभिजित शिंदे, व इतर गणमान्य मान्यवर उपस्थित होते

मन की बात ह्या काव्यसंग्रहात मन की बात ह्या कार्यक्रमाची विशेषता, महत्व व आवश्यकता याची माहीती दिलेली आहे. प्रकाश तेली यांनी मन की बात वर 50 कविता लिहिलेल्या असून प्रत्येक कवितेचे वेगळे असे वैशिष्ट आहे तेली यांनी काव्य व घोष वाक्य (कोट्स) लिहिण्याचा विश्वविक्रम केलेला आहे तसेच भविष्यात अनेक पुस्तके वाचकाकरीता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मन की बात काव्यसंग्रहाचे अनेक मान्यवरांनी केले कौतुक :-

    मन की बात काव्य संग्रहाचे भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक केंद्रीय मंत्री यांनी कौतुक केले आहे प्रकाश तेली यांनी अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर 5000 पेक्षा जास्त कविता व 6000 पेक्षा जास्त सामाजिक कोट्स लिहिलेले आहेत 

मन की बात काव्यसंग्रहास राजकीय चष्म्यातून पाहू नये:- प्रकाश तेली

मन की बात काव्य संग्रह लिहिण्यामागे प्रमाणिक व चांगला हेतु आहे मन की बात कार्यक्रमातुन जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्यातून राष्ट्रीय कार्यास कशी चालना मिळते हे ह्या काव्य संग्रहाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तसेच मी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता किंवा प्राथमिक सदस्य सुद्धा नाही त्यामुळे ह्या काव्यसंग्रहास राजकीय चष्म्यातून पाहू नये अशी विनंती प्रकाश तेली यानी केलेली आहे