भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धडाडीचे व एकनिष्ठ कार्यकर्ते श्री नंदकुमार सोनार यांची शासकीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धडाडीचे व एकनिष्ठ कार्यकर्ते श्री नंदकुमार सोनार यांची शासकीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड

( पाचोरा ) प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात विविध समित्या स्थापन केले असून यामार्फत नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत म्हणून विविध स्तरावर समित्या बनवून कार्यकर्त्यांना संधी देण्यात प्राधान्य दिले अशीच एक पाचोरा तालुक्यात विद्युत वितरण नियंत्रण समिती बनविण्यात आली असून त्या समितीचे अध्यक्ष पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील असून यावर वरिष्ठ अधिकारी विद्युत वितरण कंपनीचे जिल्हा परिषद सदस्य या समिती सदस्य आहे तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व नेहमी सर्वांच्या संपर्कात असलेले काँग्रेस चे धडाडीचे कार्यकर्ते व एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले पाचोरा शहरातील सर्वांचे परिचित श्री नंदकुमार सोनार यांची विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड केली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे