सौ. सुमनताई गि.पाटील माध्य.विद्यालय व सौ.जयश्री ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात भडगाव सत्कार समारंभ संपन्न

सौ. सुमनताई गि.पाटील माध्य.विद्यालय व सौ.जयश्री ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात भडगाव सत्कार समारंभ संपन्न

भडगाव (प्रतिनिधी)
शाळेतील माजी विद्यार्थी यांची एमपीएससी व स्पर्धापरीक्षा मध्ये यश मिळवून विविध पदांवर नियुक्ती बद्दल शालेय परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला
कला शाखेची विद्यार्थिनी सीमा राजेंद्र शिरसाठ हिची टॅक्स असिस्टंटgst पदी तर वैभव विनायक दाभाडे याची मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदी निवड झाली.
याबद्दल पाचोरा तालुका सह.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री. दिलीपभाऊ वाघ,चेअरमन नानासाहेब श्री.संजय वाघ, व्हॉईसचेअरमन नानासाहेब श्री. व्ही. टी.जोशी,मानद सचिव दादासाहेब श्री.महेश देशमुख,शालेय समिती चेअरमन आबासाहेब श्री.दत्तात्रय पवार,उच्च माध्यमिक चे चेअरमन बाबासाहेब श्री.विनय जकातदार, उच्च माध्य.व्यवसाय अभ्यासक्रम चेअरमन नानासाहेब श्री.विजय देशपांडे,मुख्याध्यापक/प्राचार्य दादासाहेब विश्वासराव साळुंखे
यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आज शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक श्री.के.एस.पाटील सर,तर मंचावर
उपप्राचार्य श्री. संदीप सोनवणे सर,पर्यवेक्षक श्री. एस .एम.पाटील यशस्वी विद्यार्थी चे आई वडील उपस्थित होते
वैभव दाभाडे या विद्यार्थ्याचा सत्कार शाल, पुष्गुच्छ देऊन उपमुख्याध्यापक श्री.के.एस.पाटील यांनी केला तर
सिमा शिरसाठ या विद्यार्थिनीचा सत्कार उपप्राचार्य श्री संदीप सोनवणे यांनी केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा परिचय श्री बाळासाहेब जडे यांनी करून दिला.शिक्षकांना मधून पर्यवेक्षक श्री. एस.एम.पाटील व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कोसोदे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले
तर सीमा शिरसाठ आणि वैभव दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले
स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे या विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळा व शाळेतील शिक्षकानं प्रती आभार मानले
अध्यक्षीय भाषणात

उपमुख्याध्यापक श्री के. एस.पाटील यांनी यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, आवडी प्रमाणे क्षेत्र निवडा
आणि जीवनात यशस्वी होऊन शाळेचे ,आई वडीलआणि गावचे
नाव उज्वल करा ,आणि सीमा आणि वैभव यांना पुढील आयष्यासाठी शुभेच्छा दिल्यात
कार्यक्रमाचे सू्रसंचालन श्री. शरद पाटील यांनी तर आभाप्रदर्शन श्रीमती मंजुषा पाटील मॅडम यांनी केले
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर बंधु भगिनी
आणि विद्यार्थी उपस्थित होते.